आफ्रिकेला “ईदाई’ चक्रीवादळाला तडाखा 

हजारो बेपत्ता, जनजीवन विस्कळीत 
मोझंबिक – आफ्रिकेतील मोझंबिक येथे आलेल्या चक्रिवादळाने हाहाकार उडवला आहे. या चक्रिवादळाचे नाव ईदाई असे आहे. या चक्रिवादळात सुमारे 180 नागरिकांचे बळी गेले आहेत. या चक्रीवादळामुळे हजारो लोक बेपत्ता झाले आहेत. ताशी 177 किमी वाऱ्याच्या वेगाने आलेल्या या चक्रीवादळाने जनजीवन पार विस्कळीत झाले आहे.
आफ्रिकन देशामध्ये आलेली ही आजवरची सर्वात मोठी नैसर्गिक आपत्ती ठरली आहे. या वादळामुळे बैरा शहराचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. या शहराची लोकसंख्या केवळ 5 लाख आहे. बैरा हे शहर सोफाला प्रांतात येते. या प्रांताचे राज्यपाल अल्बर्टो मोडंलेन यांच्या मते देशातील प्रत्येक जण आपत्तीचा सामना करत आहे.

बचाव पथकात काम करणाऱ्या युनायटेड नेशनचे कर्मचारी जेराल्ड बोरुक यांनी दिलेल्या माहितीनुसार आपत्तीग्रस्त परिसरात जवळपास सर्व घरे मोडकळीला आली आहेत. या आपत्तीत एकही इमारत वाचलेली नाही. वीज, दळणवळण यंत्रणा कोलमडली आहे. रस्त्यांवर सर्वत्र विजेचे खांब पडलेले आहेत. हजारो नागरीक बेपत्ता आहेत. ईदाई नामक हे चक्रिवादळ केवळ मोझंबिक देशापुरतेच मर्यादीत राहिले नाही तर ते पार झिम्बाब्वे व मालवी या दोन देशांमध्येही पोहोचले आहे. या दोन देशांमध्ये आतापर्यंत एकूण 220 लोकांनी प्राण गमावले आहेत. या तिन्ही देशांमध्ये राष्ट्रीय आपत्ती जाहीर करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)