अफगाणिस्तानच्या सहभागाने तालिबान संतप्त-शांतिचर्चा केली रद्द

पेशावर (पाकिस्तान): अफगाणिस्तानच्या सहभागाने संतप्त झालेल्या तालिबानने शांतिचर्चा रद्द करून टाकली आहे. अमेरिकेच्या प्रतिनिधींबरोबर तालिबान प्रतिनिधींची कतारमध्ये दोन दिवसांची शांतिचर्चा होणार होती. मात्र या शांतिचर्चेत अफगाणिस्तानच्या सहभागाच्या कारणामुळे संतप्त झालेल्या तालिबानने चर्चाच रद्द करून टाकली आहे. संघर्ष विराम आणि कैद्यांची अदलाबदल या कारणांमुळे तालिबानने अफगाण प्रतिनिधींचाचर्चेतील सहभाग फेटाळला आहे. उलटपक्षी अफगाण प्रतिनिधींबरोबर तालिबानने चर्चा करावी यावर अमेरिकन अधिकारी जोर देत होते.

चालू वर्षी अफगाणिस्तानमध्ये युद्धविरामाची घोषणा करण्याबाबतही दोन्ही पक्षांत मतभेद निर्माण झाले. त्यानंतर दोन्ही पक्षांचे कतारमध्ये बैठक न घेण्याचे एकमताने ठरवले. झाले. अमेरिकेने 25 हजार कैदी सोडून द्यावेत अशी अशी मागणी तालिबानने केली होती, पण अमेरिका फक्त 3 हजार कैदीच मुक्त करू इच्छिते.

तालिबान मीडियाशी ज्या प्रकारे चर्चा करते, तशीच चर्चा त्यांनी अफगाण (सरकार) बरोबरही केली पाहिजे असे अमेरिकेचे काबूलमधील राजदूत जॉन बॉस यांनी बुधवारी ट्‌विट केले आहे.

सन 2001 पासून युद्धग्रस्त असलेल्या अफगाणिस्तानमध्ये सध्या अमेरिकेचे 14 हजार सैनिक आहेत. ते परत बोलवावेत अशी तालिबानची मागणी आहे. अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच सुमारे 7 हजार सैनिक मागे घेण्याची घोषणा केली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)