अफगाणिस्तानमध्ये स्फोट २० जण ठार तर ५० जखमी

संग्रहित छायाचित्र

काबुल: अफगाणिस्तान मधील गरदेज शहरात आज शुक्रवारी मस्जिदीजवळ स्फोट झाला. यामध्ये २० लोकांचा मृत्यू झाला असून ५० लोक जखमी झाले आहेत.

नुकत्याच आलेल्या वृत्तानुसार स्फोट दुपारी दीड वाजता झाला. गरदेज जिल्ह्यातील पुलिस जिल्ह्या २ मध्ये इमाम-ए-जमन मस्जिद येथे दुपारी नमाजाच्या वेळेवर स्फोट झाला.

एका पोलीस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, मस्जिद मध्ये नमाज पढत असताना एकामागे एक स्फोट झाले. मृतांच्या संख्येत वाढ होऊ शकते. शहरात वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये लोकांना भरती करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)