अफगाणिस्तानात लष्करी हस्त्तक्षेप नाही : भारत

प्रातिनिधिक छायाचित्र

नवी दिल्ली: अफगाणिस्तानात लष्करी हस्तक्षेप न करण्याचे धोरण कायम असल्याचे भारताने म्हटले आहे. अफगाणिस्तानातील आपले लष्कर कमी करण्याचा आपला निर्णय अमेरिकेने जाहीर केल्यानंतर शेजारी राष्ट्रांच्या वातावरणात होत असलेला फरक चिंताजनक आहे. खास करून पाकिस्तानचे समर्थन असलेल्या तालिबान्यांना मिळणारे महत्त्व भारतासाठी डोकेदुखी ठरणार आहे.

अफगाणिस्तानातील अमेरिकन सैनिकांची संख्या 15,000 वरून कमी करून 8,000 करण्याच्या अमेरिकेच्या निर्णयानंतर पाकिस्तान आणि चीन यांची अफगाणिस्तानाबाबत बोलणी सुरू झाली आहेत. या बदलत्या वातावरणात तालिबानविरोधी असणाऱ्या इराणनेदेखील तालिबान प्रतिनिधींबरोबर बोलणी सुरू केली आहेत. रशिया तर पूर्वीपासूनच तालिबानसंबंधी अफगाण समस्या सोडविण्यासाठी सक्रिय आहे. तालिबानची बोलणी सुरू झालेली नाहीत असे अफगाण सरकारचे अश्रफ गनी आणि भारत हे दोनच घटक आहेत. तालिबानशी बोलणी न करण्याच्या आपल्या धोरणाबाबत भारत ठाम असला, तरी अफगाणिस्तानात शांती स्थापन करण्याच्या कोणत्याही प्रयत्नाला भारताचा पाठिंबाच असणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सामान्य जनतेचे जीवनमान सुधारण्यासाठीच अफगाणिस्तानात सुमारे चार अब्ज डॉलर्सच्या 550 छोट्यामोठ्या योजना भारताच्या मदतीचे चालू करण्यात आलेल्या आहेत. आणि प्रशासकीय व लष्करी प्रशिक्षणाचे कामही भारत अफगाणिस्तानात करत आहे. 1996 ते 2001 या काळात अफगाणिस्तान तालिबानचे वर्चस्व असताना भारतीय हितसंबंधांचे नुकसान करण्याचा अधिकाधिक प्रयत्न झाला. इतकेच नाही, तर भारतीय बनावटीच्या इमारतीही नष्ट करण्यात आल्या.

अफगाणिस्तनात पुन्हा एकदा तालिबान राजवट आल्यास होणारे परिणाम-
1: काश्‍मिरात दहशतवादी कारवायांना समर्थन मिळेल.
2: अफगाण प्रकरणी पाकिस्तानचे महत्त्व वाढेल.
3: तालिबानला रशियाने समर्थन दिले, तर भारत-रशिया संबंधात तणाव निर्माण होईल.
4: भारताने अफगाणिस्तानात केलेली अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक वाया जाऊ शकेल. आणि
5: अफगाणिस्तानमध्ये चीनच्या बीआरई योजनेचा वेगाने विस्तार होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)