अफगाणिस्तानमधील अध्यक्षीय निवडणूक 20 जुलै 2019 पर्यंत स्थगित

काबुल (अफगाणिस्तान): अफगाणिस्तानची अध्यक्षीय निवडणूक 20 जुलै 2019 पर्यंत स्थगित करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. गेले 17 वर्षे चालू असलेले तालिबानी युद्ध समाप्त करण्याच्या दिशेने अमेरिकन नेतृत्वाखालील चालू असलेले प्रयत्न विचारात घेऊन अफगाणिस्तानातील या सर्वात मोठ्या दहशतवादी गटाशी चर्चा करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी हा निर्णय घेतल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आयईसी (इंडिपेंडट इलेक्‍शन कमिशनने) चे अध्यक्ष अब्दुल बदी सय्यद यांनी रविवारी ही तीन महिन्यांची स्थगिती जाहीर केली. यापूर्वी अध्यक्षीय निवडणुकीची 20 एप्रिल ही तारीख निश्‍चित करण्यात आली होती.

अध्यक्ष अब्दुल गनी यांनी या नवीन वेळापत्रकाचे स्वागत केले आहे, असे अध्यक्षांच्या प्रवक्‍त्याने स्पष्ट केले. अफगणिस्तानातील 14,000 अमेरिकन सैनिक काढून घेण्याची अधिकृत घोषणा करण्यात आली नसली, तरी तशा नुसत्या सूचनेने 2019 मध्ये रक्तपात वाढण्याची भीती व्यक्‍त केली जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)