जवानांच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असाल तर,सावधान! सीआरपीएफकडून विशेष सूचना

संग्रहित छायाचित्र.....

नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीर या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतीय लष्कराचे चाळीस जवान शहीद झाले. या घटनेचा निषेध देशभरातून नोंदवला जातो आहे. सगळा देश या घटनेमुळे सगळा देश हळहळला आहे. या भ्याड हल्ल्याचा निषेधही व्यक्‍त केला जातो आहे.

या घटनेचे पडसाद सोशल माध्यमावर उमटले. लोकांकडून अनेक भावनिक पोस्ट सोशल माध्यमावर व्हायरल केल्या जाऊ लागल्या. काहींनी जवानांच्या छिन्नविछिन्न झालेल्या शरीराचे फोटो सोशल माध्यमांवर शेअर केले. त्यानंतर सीआरपीएफ ने याबाबत एक सूचनापत्र काढले आहे.

-Ads-

‘काही लोकांकडून जवानांच्या शरिराच्या वेगवेगळ्या भागाचे खोटे फोटो पसरवून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा कोणत्याही पोस्ट्स लाईक अथवा शेअर करू नका. कोणी असं करत असेल तर संबंधित पोस्टची webpro@crpf.gov.in इथे तक्रार करा,’ असं CRPF च्या ऑफिशिअल ट्विटर हँडलवर म्हणण्यात आलं आहे.

 

 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)