#विशेष लेख: ऑनलाईनचा झटका (भाग २) 

#विशेष लेख: ऑनलाईनचा झटका (भाग १) 
विद्या शिगवण
आजकाल स्मार्ट फोन, नेट यामुळे सारेच बदलून गेले आहे. हाती मोबाईल असला, नेट असले आणि त्याला रेंज असली की दुनिया मेरी मुठ्ठीमे असल्यासारखे वाटते. सारे काही रेडी. अल्लादिन आणि जादूचा दिवा गोष्टीतील दिव्याचा राक्षस कसा, दिवा घासला की समोर येऊन उभा राहायचा. क्‍या हुकूम मेरे आला असे नम्रपणे म्हणायचा आणि मागितलेली कोणतीही गोष्ट अगदी क्षणार्धात समोर हजर करायचा. अगदी राजवाडासुद्धा. पण तो ज्याच्या हाती असेल त्याचा गुलाम. त्याला विचारशक्‍ती नाही. सारासार बुद्धी नाही. 
नंतर तो अत्यंत जखमी अवस्थेत पडलेला सापड्‌ला. त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पण तो वाचू शकला नाही. ऑन लाईन प्रेमाने त्याचा बळी घेतला. आपल्या मातापित्याचा एकूलता एक पुत्र असलेला मौलिन ऑनलाईन मौत मेला. गेली चार वर्षे ते ऑस्ट्रेलियात शिकत होता. हे सारे ऐकून वाचून त्याच्या आईवडिलांचे अवस्था काय झाली असेल? म्हणूनच ऑनलाईच जपून-हे लक्षात ठेवले पाहिजे. दुसरा प्रसंग आहे आपल्या भारतातीलच. ऑन लाईन, पण वरच्या प्रसंगापेक्षा वेगळ्या प्रकारचा. पण वेगळा असला तरी प्राणघातकच.
राज्य तामिळनाडू: तामिळनाडूतील तिरपूर येथे घडलेली ही घटना. जुलै महिन्यातील. ऑन लाईन-यू ट्यूबवर पाहून तिच्या मदतीने घरीच डिलिव्हरी करण्याचा प्रयोग करणे एका महिलेच्या प्राणांवर बेतले. आणि ही महिला सुशिक्षित होती-शिक्षिका होती. ही तिची दुसरी डिलिव्हरी होती, तिची पहिली मुलगी आहे 3 वर्षांची. या महिलेचे नाव होते क्रिथिगा आणि वय होते 28. म्हणजे अगदीच तरुण. आपल्या पतीच्या मदतीने तिने यावेळी घरीच डिलिव्हरी करायचे ठरवले. यू ट्युऊबवर डिलिव्हरीचे व्हिडियोज पाहिले होते. तसे यू ट्यूबवर काय पाहायला मिळत नाही? सारे काही मिळते. हवे ते आणि नको ते ही. नको ते जास्तच. क्रिथिगाच्या मैत्रिणीनेही घरीच डिलिव्हरी केली होती. तिचा कित्ता क्रिथिगाने गिरवला. प्राण गमावले. होम डिलिव्हरी केल्यानंतर क्रिथिगाला रक्‍त्रस्राव होऊ लागला. आणि त्यातच तिचा मृत्यू झाला, या दोन घटना उजेडात आल्या. त्यांच्या बातम्या झाल्या. त्यामुळे त्या जगासमोर आल्या. अशा अज्ञात कितीजणांचे मृत्यू झाले असतील. तेव्हा ऑनलाईन हे दुधारी शस्त्र आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. त्याचा वापर काळजीपूर्वक केला पाहिजे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)