#विशेष लेख: ऑनलाईनचा झटका (भाग १) 

विद्या शिगवण
आजकाल स्मार्ट फोन, नेट यामुळे सारेच बदलून गेले आहे. हाती मोबाईल असला, नेट असले आणि त्याला रेंज असली की दुनिया मेरी मुठ्ठीमे असल्यासारखे वाटते. सारे काही रेडी. अल्लादिन आणि जादूचा दिवा गोष्टीतील दिव्याचा राक्षस कसा, दिवा घासला की समोर येऊन उभा राहायचा. क्‍या हुकूम मेरे आला असे नम्रपणे म्हणायचा आणि मागितलेली कोणतीही गोष्ट अगदी क्षणार्धात समोर हजर करायचा. अगदी राजवाडासुद्धा. पण तो ज्याच्या हाती असेल त्याचा गुलाम. त्याला विचारशक्‍ती नाही. सारासार बुद्धी नाही. 
या स्मार्टफोनची अवस्था अल्लादिन आणि जादूचा दिवा गोष्टीतील दिव्यासारखीच आहे. दिवा घासायला लागायचा, स्मार्टफोनला नेटवर्क आणि रेंज लागते, आणि स्मार्टफोनची दुनिया ही आभासी दुनिया आहे. त्यात प्रत्यक्ष निदान सध्या तरी काहीच मिळत नाही, सारी बोलाचीच कढी बोलाचाच भात अशी अवस्था. स्मार्टफोनमध्ये सारे शब्दांचे चित्रांचे मायाजाल. बाकी सारे आपणच करायचे. इतकी ऍप आहेत की विचारता सोय नाही. पाहिजे त्याचे ऍप आहे.
वेन्सडे चित्रपटात नाही का, नस्रुद्दीन शाह सांगतो-बॉंब कसा बनवायचाअ याची माहिती ऑनलाईन कोणालाही सहज उपलब्ध आहे. तसेच आहे. हवे ते मागा. माहिती चिमूटभर मागितली तर ट्रकभरून देणार असा उदार आहे तो, पण मग त्या ट्रकभरमधून घ्यायचे काय अशा गोंधळात आपण पडतो. आणि हात मग रिकामेच राहतात. किंवा पोळून निघतात. स्मार्टफोन फायद्याचा आहे यात काही शंकाच नाही, पण तो तितकाच उपद्रवीही आहे याचा आपण भारतातही अनुभव घेतला आहे, घेत आहोत. स्मार्टफोन नसता तर गुन्हेगारी-दंगेधोपेही इतक्‍या मोठ्या आणि संघटित प्रमाणात होऊच शकले नसते ही वस्तुस्थिती आहे.
आज मला या स्मार्ट फोनच्या दुसऱ्या बाजूची, उपद्रवीपणाची आठवण होण्याचे कारण वाचलेले दोन प्रसंग.
ऑन लाईन डेटिंग, प्रेम, विवाह याबद्दल आपण्‌ नेहमी ऐकतो-वाचतो आणि पाहतोही.आपल्या परिचितांमध्येही अनेक विवाह अशा प्रकारे झाल्याचे आपण पाहिले आहे. ऑस्ट्रेलियात एका भारतीय युवकाला ऑनलाईन डेटिंगमुळे प्राण्‌ गमवावे लागल्याची बातमी हल्लीच वाचनात आली. ऑनलाईन डेटिंग करून मैत्रिणीला किंवा आजच्या भाषेत गर्ल फ्रेंडला भेटायला गेलेला हा भारतीय युवक परत आलाच नाही, त्याची हत्या करण्यात आली. मौलिन राठोड असे त्या युवकाचे नाव. मेलबोर्नमध्ये शिकत असलेला हा युवक मेलबर्नच्या सनबरी उपनगरात आपल्या ऑनलाईन डेटला भेटायला गेला.
#विशेष लेख: ऑनलाईनचा झटका (भाग २) 

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)