आडवाणी आणि जोशींच्या पंक्तीत सुमित्रा महाजनही?

इंदूरमधील भाजपच्या उमेदवाराबाबत सस्पेन्स
भोपाळ – भाजपने अद्याप मध्य प्रदेशच्या इंदूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यातून निर्माण झालेल्या सस्पेन्समुळे लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनाही लालकृष्ण आडवाणी आणि मुरलीमनोहर जोशी या ज्येष्ठ नेत्यांच्या पंक्तीत बसावे लागणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

वयाची पंचाहत्तरी ओलांडलेल्या ज्येष्ठ नेत्यांना निवडणूक रिंगणात न उतरवण्याचे धोरण भाजपने अवलंबले आहे. त्यातून आडवाणी आणि जोशी या दिग्गजांनाही उमेदवारी नाकारण्यात आली. अशातच इंदूरचा उमेदवार भाजपने अजून जाहीर केला नसल्याने 75 वर्षीय महाजन यांच्या उमेदवारीबाबत तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. महाजन या इंदूरच्या विद्यमान खासदार आहेत. त्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व त्या आठव्यांदा लोकसभेत करत आहेत. दरम्यान, महाजन यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्‍यता धूसर असल्याचे संकेत भाजपच्या सुत्रांनी दिले आहेत. तर स्वत: महाजन यांनी उमेदवारीबाबत अद्याप पक्षातील कुणी माझ्याशी बोलले नसल्याचे स्पष्ट केले आहे. मध्य प्रदेशात लोकसभेच्या एकूण 29 जागा आहेत. त्यातील 18 जागांवरील उमेदवार भाजपने आतापर्यंत जाहीर केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)