जाहीरात क्षेत्रातील मातब्बर ऍलेक पदमसी यांचे निधन 

मुंबई – जाहींरात क्षेत्रातील मातब्बर व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे ऍलेक पदमसी यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले ते 90 वर्षांचे होते. ऍड गुरू म्हणून ते परिचित होते. ते लिंटास या प्रख्यात जाहीरात कंपनीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी होते.

सर्फसाठी त्यांनी केलेली ललिताजी ही जाहीरात तसेच चेरी ब्लॉसम या बुट पॉलिशसाठी त्यांनी केलेली चेरी चार्लीची जाहीरात ही त्यांची विशेष कामगीरी होती. जाहीरात क्षेत्रात त्यांनी अत्यंत नाविन्यपुर्ण व कल्पक संकल्पना आणल्या. लिरील व हमारा बजाजची त्यांची जाहीरातही खूपच गाजली होती. ते हौशी अभिनेतेही होते. रिचर्ड ऍटेनबरोच्या गांधी चित्रपटात त्यांनी बॅरिस्टर जिनांची व्यक्तिरेखा साकारली होती. केंद्र सरकारने त्यांचा सन 2000 साली पद्‌मश्री पुरस्कार देऊन गौरवही केला होता.

-Ads-

त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, कॉंग्रेस नेते मिलींद देवरा, फोटोग्राफर अतुल कसबेकर, तृणमुल कॉंग्रेसचे नेते डेरेक ओबेरियन, आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रीती मेनन आदिंनी शोक व्यक्त केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)