चार ठिकाणचा भार एका केंद्रावर

पॉलिटेक्‍निक प्रवेश फेरी : प्रवेश निश्‍चितीसाठी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मोठी गर्दी

रात्री उशिरापर्यंत ताटकळत थांबावे लागल्याचे चित्र

-Ads-

पुणे – दहावीनंतरच्या पॉलिटेक्‍निकला प्रवेश पहिली फेरीनुसार होत आहेत. पुणे जिल्ह्यासाठी चार पॉलिटेक्‍निक महाविद्यालयात प्रवेश निश्‍चिती (कन्फर्म) केली जात आहे. मात्र प्रवेश निश्‍चितीसाठी पुणे विद्यापीठ रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन येथेच विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. त्यामुळे प्रवेश निश्‍चितीसाठी विद्यार्थ्यांना रात्री उशिरापर्यंत ताटकळत थांबावे लागल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

पॉलिटेक्‍निकची पहिली यादी दि. 31 जुलै रोजी प्रसिद्ध झाली. त्यानंतर दि. 1 ते 3 ऑगस्ट या कालावधीत जवळच्या “एआरसी’ केंद्र येथे कागदपत्र पडताळणी व प्रवेश निश्‍चित करण्यासाठी विद्यार्थ्यांना कालावधी देण्यात आला आहे. पुण्यात चार एआरसी केंद्र निश्‍चित करण्यात आले आहे. शहरातील शासकीय पॉलिटेक्‍निक, वाडिया, पुणे विद्यापीठाचे गृहाचे पॉलिटेक्‍निक आणि अवसरी बुद्रुकच्या पॉलिटेक्‍निक येथे प्रवेशासाठी एआरसी केंद्र होते. मात्र विद्यार्थ्यांनी अन्य केंद्रावर न जाता शासकीय पॉलिटेक्‍निक येथे कागदपत्राची पडताळणी करण्यासाठी आले होते. या ठिकाणी सुमारे एक हजार विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

पहिल्या फेरीत प्रवेश निश्‍चित होताच, सर्व कागदपत्रांची तपासणी करून त्यांच्याकडून खातरजमा करावी लागते. त्यानंतर विद्यार्थ्यांना दि. 19 तारखेपर्यंत ज्या पॉलिटेक्‍निकला प्रवेश मिळाला आहे, तेथे कागदपत्रे सादर करून शुल्कासह प्रवेश घ्यावा लागतो. त्यासाठी प्रवेश कन्फर्मसाठी एआरसी केंद्र महत्त्वाचे आहे. मात्र बुधवारपासून प्रवेशप्रक्रिया सुरू असतानाच विद्यार्थ्यांची गुरुवारी, तेही शासकीय तंत्रनिकेतन येथे गर्दी केल्याने नियोजावर ताण पडल्याचे दिसून आले. दरम्यान, कागदपत्र पडताळणी ही राज्यातील कोणत्याही एआरसी केंद्रावरून करून घेता येऊ शकतो. त्यामुळे रत्नागिरी, चिपळूण येथील विद्यार्थीही पुण्यात पडताळणीसाठी आले होते. त्यामुळे गर्दी मोठ्या संख्येने झाल्याचे स्पष्ट होत आहे.

पुण्यात चार एआरसी केंद्र असून, विद्यार्थ्यांनी सोयीच्या ठिकाणी कागदपत्र पडताळणी व प्रवेश निश्‍चित करावे. ज्या विद्यार्थ्यांना सकाळी टोकन देण्यात आले आहे, त्यांना रात्री उशिरापर्यंत थांबून प्रवेश निश्‍चिती केली जाते. त्यासाठी 14 टेबलाची व्यवस्था केली असून, त्यानुसार ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी एकाच केंद्रावर गर्दी करू नये, असे आवाहन शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. डी. आर. नंदनवार यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)