पुस्तक घोटाळा प्रकरणी प्रशासनावर हल्ला बोल

नगर पालिका सर्वसाधारण सभेत
सिध्दी पवार यांचा उपोषणाचा इशारा तर लेवें धरले प्रशासनाला धारेवर
सातारा – सातारा पालिकेच्या सभागृहात मंगळवारी आठ लाख रुपयांचा पुस्तक घोटाळा नगरसेवक वसंत लेवे यांनी उघड करत प्रशासनावर हल्लाबोल केला . सत्ताधारी सातारा विकास आघाडी व विरोधक नगरसेवक नगर विकास आघाडी यांच्यात टक्केवारीवरून कळवंड रंगल्याने सर्वसाधारण सभेत जोरदार खडाजंगी झाली . मंगळवार तळे येथील सर्वे नं 195 येथ पालिका इमारतीत तातडीने ग्रंथालय सुरू झाले नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषणाचा इशारा भाजपच्या नगरसेविका सिध्दी पवार यांनी दिला . नगराध्यक्ष माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत एकूण अठरा विषयांना मंजूरी देण्यात आली .

सातारा पालिकेच्या सर्वसाधारण सभेत बीव्हीजीकडून घरकुलांची झालेली निकृष्ट कामे परस्पर झालेली व्हॉल्वमन भरती, मंगळवार तळे येथील स्व. अभयसिंहराजे भोसले ग्रंथालयासाठी झालेली पाच हजार पुस्तकांची परस्पर खरेदी या ऐन वेळेंच्या विषयांवरून सभागृहात तीव्र पडसाद उमटले . नगरसेवक वसंत लेवे यांनी कागदपत्रांसह या पुस्तक खरेदीत झालेला भ्रष्टाचार तपशीलवार मांडत नगर विकास आघाडीला पहिल्यांदाच कोंडीत पकडले . मंगळवार तळे येथील पालिकेची इमारत बांधकाम पूर्णत्वाचा दाखला नसताना कराराने अभयसिंहराजे भोसले ट्रस्टला कोणत्या आधारावर देण्यात आली. फर्निचर व पुस्तकांसाठी आठ लाख रुपये खर्च झाले तर उंची वाढवावी कशी हे पुस्तक तरी पालिकेत पहायला मिळणार आहे का? असा उपरोधिक सवाल वसंत लेवे यांनी केला . या प्रकरणात खोटे शपथपत्र दाखल करणाऱ्या मालपुरे व परवानगी नसताना करार करणाऱ्या वर फौजदारी कारवाई करण्याची मागणी लेवे यांनी करत मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्यावर तोफ डागली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सिद्दी पवार यांनी याच प्रकरणावर जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषण करण्याचा इशारा दिला. माजी नगरसेवक अविनाश कदम यांनी ही इमारत हडप करण्याचा प्रयत्न केला आहे असा आरोप लेवे यांनी करताच एकच गोंधळाला सुरवात झाली . युनियन क्‍लब येथील स्व. गोपीनाथ मुंडे स्मृती उद्यान, तसेच ग्रंथालय मंगळवार तळे येथील इमारतीत का सुरू नाही ? या प्रश्नांवरून सिद्धी पवार आक्रमक झाल्या . मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी इमारतीला बांधकाम पूर्णत्वाचा दाखला नाही . त्यामुळे ट्रस्टला चावी दिलेली नाही असा खुलासा दिली . या प्रकरणाचे सत्य शोधण्यासाठी नगराध्यक्ष विरोधी पक्षनेते व मुख्याधिकारी यांची कमिटी नेमून अहवाल देण्याचा निर्णय झाला . निशांत पाटील यांनी देशपातळीवर प्रसिद्ध असणाऱ्या बीव्हीजी कंपनीवर निशाणा साधला .

ज्या कंपनीचा ठेकेदार थेट पंतप्रधानांना भेटू शकतो त्या कंपनीकडून घरकुलाचे काम इतके निकृष्ट कसे ? लाभार्थ्यांचे नळकनेक्‍शनचे जे डिपॉझिट असेल ते माघारी देण्याची विनंती पाटील यांनी केली . आशा पंडित यांनी करंजे एमआयडीसी प्रकरणाची पोलखोल झाली तर बरेच तुरूंगात जातील असा बॉम्ब टाकला . व्हॉल्व मॅनच्या परस्पर भरतीवर प्रचंड गदारोळ झाला . साताऱ्यात 54 व्हॉल्व मॅन आहेत . इतक्‍या कर्मचाऱ्यांची खरच गरज आहे का ? अशी उपसूचना मोने यांनी मांडून विषय तहकूबीची मागणी केली . ऍड़. बनकर यांनी मिले सूर मेरा तुम्हारा ची आळवणी करत भाजप व नगर विकास आघाडीच्या नगरसेवकांना विकास कामांचे प्रस्ताव द्या , विरोधाला विरोध करू नका असे आवाहन केले . कॉम्पॅक्‍टर वारंवार बंद पडण्यामागे काय राजकारण आहे ? याची विचारणा पक्ष प्रतोद अमोल मोहिते यांनी प्रशासनाला केली .कॉम्पॅक्‍टरचा सगळा खर्च साशाकडून वसूल केला जाईल असे बनकर यांनी खुलासा केला . उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी पेपरात खऱ्या बातम्या किती येतात ? असे आक्षेपार्ह विधान केल्यानंतर प्रसारमाध्यमांनी तीव्र नाराजी व्यक्त केली . वातावरणाचा रंग बघत उपनगराध्यक्षांनी सभेतच पत्रकारांची जाहीर माफी मागितली . त्यामुळे वादावर पडदा पडला .

विशाल जाधव प्रकरणांवरही गहजब :
घंटागाडी चालक ज्ञानेश्वर शेलार याच्या विषप्राशन प्रकरणावर विशाल जाधव यांनी कसा त्रास दिला याची मांडणी अशोक मोने नी केल्यावर दोन्ही आघाड्या हमरी तुमरीवर आल्या . ऍड दत्ता बनकर व मोने यांच्यात खडाजंगी झाली . तुम्ही साव असल्याचा अभिनय करू नका असा टोला मोने यांनी लगावला . तेव्हा आम्ही काय करायचे ? ते आम्हाला आमच्या नेत्यांनी सांगितले आहे. तुम्ही काही बोलू नका , असे जोरदार प्रत्युत्तर बनकर यांनी दिले . स्वतः वसंत लेवे यांनी उठून घंटागाडी चालकच दोषी असल्याचे सांगत विशाल जाधव यांना क्‍लीन चिट दिली . यावेळी संपूर्ण सातारा विकास आघाडी जाधव यांच्या मागे ठामपणे उभी असल्याचे पहायला मिळाले


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)