आदिवासी दिनानिमित्त शालेय साहित्याचे वाटप

राहुरी – जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून ठाकरवाडी वावरथ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पुण्याच्या खुशी के रंग, ऍप्रोच हेल्पिंग हॅंड फाउंडेशन व चैतन्य फाउंडेशन यांच्या संयुक्‍त विद्यमाने शालेय साहित्याचे वाटप जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव गाडे, सामाजिक कार्यकर्ते अण्णा सोडनर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी गाडे यांनी शाळेत राबवित आलेल्या विविध उपक्रमांचे कौतूक केले. दुर्गम भागात असलेल्या वावरथ व जांभळी परिसरातील शाळा व त्यामधील सर्व शिक्षक खऱ्या अर्थाने चांगले काम करत आहेत. चांगले काम करणाऱ्या शिक्षकांना सर्व ग्रामस्थांनी नेहमी सहकार्य करावे. ठाकरवाडी (वावरथ) मधील सर्व ग्रामस्थांनी लोकसभागातून शाळेला 1 लॅपटॉप घेऊन जे योगदान दिले त्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले.

यावेळी वावरथ सोसायटीचे अध्यक्ष आप्पा बाचकर, वावरथ सोसायटीचे संचालक नारायण शेलार, ग्रामपंचायत सदस्य मीनानाथ जाधव, लिंबाबाई मधे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय जाधव, सत्यसेवा ग्रामीण विकास संघटनाचे अध्यक्ष मंगेश जाधव, हरीभाऊ जाधव, ममता जाधव, हिरामण जाधव, रावसाहेब जाधव, धोंडिभाऊ बाचकर, बाळासाहेब मधे, नामदेव मधे, वामन जाधव उपस्थित होते. यावेळी शाळेत वृक्षारोपण करण्यात आले. प्रास्ताविक मुख्याध्यापिका वैशाली खरमाळे यांनी तर सुत्रसंचालन दत्तात्रय डोईफोडे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)