पाटणा -कायदेमंत्रीपदी काम करताना राममंदिर उभारणी आणि मुस्लीम महिलांना मोठा दिलासा देणाऱ्या तिहेरी तलाक कायद्यासाठी झटणारे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांना मोठया मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पाटणा येथील भाजपच्या प्रचारसभेत मतदारांना केले.
प्रसाद हे या एनडीएच्या दोन प्रमुख लक्ष्यांचे वकील आहेत, असा गौरवास्पद उल्लेखही योगी यांनी सभेत केला. बिहारच्या पाटणा साहिब लोकसभा मतदारसंघात प्रसाद यांचा सामना माजी भाजप नेते आणि आता कॉंग्रेसवासी झालेले शॉटगन शत्रुघ्न सिन्हा यांच्यात आहे. त्यामुळे या सुपरफाइटकडे समस्त देशाचे लक्ष लागले आहे.