नवी दिल्ली – भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या कोलकाता येथील रोड शोवेळी मंगळवारी तुफान राडा झाला. यावेळी भाजप आणि तृणमूल कॉंग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने रोड शो पूर्णत्वास जाऊ शकला नाही. राड्यावेळी दगडफेक आणि जाळपोळीचे प्रकार घडले. दरम्यान याच पार्श्वभूमीवर आज कोलकाता येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची होणारी सभा भाजपतर्फे रद्द करण्यात आली आहे.
Rahul Sinha, BJP, on Yogi Adityanath’s rally in Kolkata cancelled:When stage was being set up y’day, labourers working on it were beaten up & scared away; the stage was vandalised. The public meeting was scheduled for 2 pm today, stage couldn’t be repaired. So we had to cancel it pic.twitter.com/v7ttyWZvrc
— ANI (@ANI) May 15, 2019
याबाबत सविस्तर माहिती देताना भाजप नेते राहुल सिन्हा यांनी सांगितले की, “आज दुपारी दोन वाजता कोलकात्यात योगी आदित्यनाथ यांची सभा होणार होती. मात्र काल भडकलेल्या हिंसेनंतर काही लोक योगी आदित्यनाथ यांची सभा होणार असलेल्या ठिकाणी आले व त्यांनी सभा मंडप उभारणाऱ्या कामगारांना मारहाण करत त्यांना तिथून पिटाळून लावले. सदर लोकांनी स्टेजची देखील मोडतोड केली असून आता पुन्हा स्टेज उभारणे शक्य नसल्याने ही सभा रद्द करण्यात आली आहे.”