पुणे विभागात अडिच हजार तलाठी पदे मंजूर

पुणे – गावातील शेतजमिनीचा प्रश्‍न सरकारपर्यंत पोचविण्याचे काम करणाऱ्या तलाठ्यांचे अनेक समस्या शासनदरबारी प्रलंबित आहेत. पुणे महसूल विभागातील पाच जिल्ह्यामध्ये दोन हजार 543 तलाठ्यांची पदे मंजूर असून, एक हजार 620 तलाठी स्थायी स्वरूपात कार्यरत आहेत; तर 923 तलाठी कित्येक दिवसांपासून अस्थायी पदावर काम करीत आहेत. त्यांना 28 फेब्रुवारी 2019 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

महसूल यंत्रणेतील शेवटचा घटक म्हणून तलाठी हे पद अत्यंत महत्त्वाचे आहे. शासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून तो काम करतो. गावपातळीवरील मूलभूत घटक म्हणून शासन तलाठयाला विविध परिपत्रके, शासन निर्णय, स्थायी आदेश, किंवा सूचना देते. पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यात दोन हजार 543 तलाठी पदे मंजूर आहेत.त्यातील 1620 तलाठी स्थायी स्वरूपात आहेत; तर 923 तलाठी अस्थायी स्वरूपात पदावर आहेत. त्यामध्ये पुणे जिल्ह्यात 606 पदे मंजूर असून, 393 स्थायी तर 213 अस्थायी पदावर कार्यरत आहेत.

सातारा जिल्ह्यात 556 तलाठी पदे मंजूर असून, त्यात 300 स्थायी व 256अस्थायी पदावर काम करीत आहेत. सांगलीमध्ये 366 पदे मंजूर आहेत. त्यातील 227 स्थायी तर 139 तलाठी अस्थायी पदावर कार्यरत आहेत. सोलापूरमध्ये 552 पदे मंजूर असून, त्यातील 324 स्थायी तर 228 पदे अस्थायी आहेत. तर कोल्हापूर जिल्ह्यात 463 पदे मंजूर असून, त्यापैकी 376 पदे ही स्थायी असून, 87 पदे ही अस्थायी आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
7 :thumbsup:
1 :heart:
1 :joy:
2 :heart_eyes:
0 :blush:
2 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)