जिल्हा सेक्रेटरीपदी ऍड. टोकेकर, तर जिल्हा मार्गदर्शकपदी पवार
नगर – आयटक प्रणित लाल बावटा जनरल कामगार युनियनची स्थापना होऊन 10 वर्षे होत आलेली आहेत. नुकतीच संघटनेची वार्षिक मिटिंग बुरुडगांव रोड येथील संघटनेच्या कार्यालयात संघटनेचे अध्यक्ष कॉ.सुभाष लांडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
लाल बावटा संघटनेमध्ये विविध घटकांतील कामगार सभासद आहेत, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने संघटना व त्यांचे सर्वत्र पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत. त्यास सर्व कर्मचारी साथ देत आहेत. किमान वेतन, राहणीमान भत्ता, बोनस, कर्मचारी कायम सेवेत घेणेबाबत मोहटा देवी जगदंबा ट्रस्ट, कानिफनाथ ट्रस्ट, मढी, पारनेर-नगर पंचायत व इतर काही संस्थांतील कर्मचारी सभासद आहेत.
या सर्वांच्या प्रश्नावर मिटींगमध्ये चर्चा करण्यात आली. व ते सोडविण्याचे ठरले. यावेळी सन 2019 साठी जिल्हा पदाधिकारी निवडण्यात आली ती पुढील प्रमाणे -अध्यक्ष ऍड. कॉ. सुभाष लांडे, जनरल सेक्रेटरी ऍड. कॉ. सुधीर टोकेकर, जिल्हा मार्गदर्शक नारायण रंगनाथ पवार (अरणगांव), उपाध्यक्ष सतिष नारायण पवार (अवतार मेहेरबाबा ट्रस्ट), बाबासाहेब मरकड (मढी देवस्थान ट्रस्ट), शहादेव पालवे (मोहटा देवस्थान ट्रस्ट), सहसेक्रेटरीपदी प्रवीण भिंगारदिवे (अवतार मेहेरबाबा ट्रस्ट), नवनाथ हापसे (मोहटा देवस्थान ट्रस्ट), खजिनदारपदी सुभाष शिंदे (अरणगांव मेहेरबाबा ट्रस्ट), कार्यकारी सदस्य – राजेंद्र दहिफळे, पांडूरंग दहिफळे, राधाकिसन कांबळे, सुनिता जावळे, दिगंबर माने, राजेंद्र मरकड. वरीलप्रमाणे पदाधिकाऱ्यांची सन 2019 साठी निवड झाली