पुणे – पुन्हा ‘अतिरिक्त आयुक्त हटाव’ची मोहीम

पुणे – कामे मार्गी लागत नसल्याची तक्रार करत मागील वर्षी भाजप नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी तत्कालिन अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रातर यांच्या मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी करत त्यांची बदली करून घेतली. त्या पाठोपाठ आता भाजप नगरसेवकांनी पुन्हा हाच पाढा विद्यमान अतिरिक्त आयुक्त शितल उगले यांच्याविरोधात वाचण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे आता भाजप नगरसेवकांनी “उगले हटाव’ची मोहीम सुरू केली आहे.

शितल उगले यांना हटविण्यासाठी भाजपच्या 98 पैकी तब्बल 70 नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या या पत्रावर आहेत. तसेच उर्वरित नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन हे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, भाजपचे महापालिकेतील पदाधिकारीही यात सहभागी असल्याची चर्चा आहे.

-Ads-

उगले यांच्याविरोधात भाजप पदाधिकारी आणि नगरसेवकांनी मोट बांधली आहे. उगले यांचा कार्यभार मनमानी असल्याचा आरोप करत सत्ताधाऱ्यांनी आधी त्यांच्याकडील महत्वाची खाती काढून घेण्याची मागणी आयुक्तांकडे केली होती. मात्र, आयुक्तांनी त्यावर काहीच कार्यवाही केली नाही. याशिवाय, महापालिकेच्या ताब्यात असलेल्या काही समित्यांच्या निर्णयांना उगले यांनी विरोध केला असून बदल्या आणि बढत्यांमुळे अनेक कर्मचाऱ्यांचे “ग्रेड-पे’ कमी झाले आहेत. त्यामुळे कामगार संघटनाही आक्रमक झाल्या असून त्यांच्याकडून भाजप पदाधिकाऱ्यांवर दबाव आणला जात आहे. या बदल्यांवरून तसेच नगरसेवकांच्या तक्रारींवरून मागील महिन्यात झालेल्या मुख्यसभेतही नगरसेवकांनी अतिरिक्त आयुक्त उगले यांच्यावर थेट टीका केली होती. मात्र, त्यानंतरही या दबावाला बळी न पडता उगले यांच्याकडून निर्णय घेण्याचे काम सुरूच आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा थेट मुख्यमंत्र्यांनाच साकडे घालण्याचा निर्णय भाजप नगरसेवकांनी घेतला असून उगले यांच्या बदलीचे निवेदन तयार करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
1 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)