पुणे – अतिरिक्त आयुक्तांना धक्काबुक्की; महापालिकेत आज काम बंद

पुणे – महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना झालेल्या मारहाण प्रकरणाच्या निषेधार्थ महापालिका कर्मचारी संघटना आणि अभियंता संघटनेच्या वतीने कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. मात्र, यामधून अत्यावश्‍यक सेवा वगळण्यात आल्या असून त्या ठिकाणी सर्व कर्मचारी काळ्या फिती बांधून काम करणार आहेत.

महापालिकेत झालेल्या जलपर्णीच्या आंदोलनात गोंधळ झाल्यानंतर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना महापौरांच्या दालनातच मारहाण केली. त्याचे पडसाद महापालिकेत कर्मचारी वर्गात उमटले असून ही बाब निषेधार्ह असल्याचे संघटनांनी आंदोलन पुकारले आहे. दरम्यान, काम बंद केल्यानंतर सकाळी 11 वाजता महापालिकेच्या हिरवळीवर निषेध सभा बोलाविण्यात आली असल्याचे कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींकडून सांगण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)