नगरसेवक रवींद्र धंगेकर यांना जामीन मंजूर ; अतिरिक्त आयुक्त मारहाण प्रकरण

पुणे: महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याप्रकरणात काँग्रेसचे नगरसेवक रवींद्र धंगेकर यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे सत्र न्यायाधीश थत्ते यांनी हा आदेश दिला आहे.

यापूर्वी अरविंद शिंदे यांना अटकपूर्व जामीन मिळाला आहे. तर 15 ते 16 जणांवर याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. दरम्यान, पाषाण आणि कात्रज येथील तलावांमध्ये जलपर्णी नसतानाही 23 कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात आल्याची टीका करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापौरांच्या दालनात आंदोलन केले होते. त्यावेळी निंबाळकर यांना धक्का बुक्की करण्यात आली होती, या प्रकरणात धंगेकर यांना अटक केली होती, सुरुवातीला पोलीस कोठडी, त्यानंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती, त्यानंतर त्यांनी जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने मंजूर केला

-Ads-

काय आहे प्रकरण ?

जलपर्णीची निविदा आठ पट दराने काढल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी सोमवारी दुपारी महापौर मुक्ता टिळक यांच्या दालनात बैठे आंदोलन केले. दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करा, अशी मागणी यावेळी केली होती. हे आंदोलन सुरू असताना अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर निविदेसंदर्भात माहिती देत होते. मात्र, त्यांच्याकडून या विषयातील खुलासा नको, कारण त्यांनीच ही निविदा प्रक्रिया राबवली आहे. हे अधिकारी चोर आहेत, असा आरोप धंगेकर यांनी केला.

त्यावेळी प्रत्युत्तर देताना “असे ऐकून घ्यायला आलो नाही, तुमची काय लायकी आहे का?’ अशी प्रतिक्रिया निंबाळकर यांनी दिली. त्यामुळे आंदोलनात सहभागी कार्यकर्ते संतप्त झाले आणि त्यांनी निंबाळकरांना धक्‍काबुक्‍की केली.
या घटनेनंतर रात्री उशीरा निंबाळकर यांनी शिंदे आणि धंगेकर यांच्यासह 14 ते 15 कार्यकर्त्यांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

What is your reaction?
138 :thumbsup:
14 :heart:
1 :joy:
2 :heart_eyes:
2 :blush:
2 :cry:
4 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)