रक्षाबंधननिमित्त लोकल, शटल गाड्यांमध्ये महिलांसाठी अतिरीक्त डब्बा

पुणे – रक्षाबंधननिमित्त लोकल आणि पुणे ते दौंड या लोहमार्गावरील शटल या गाड्यांमध्ये महिलांसाठी आणखी एक डब्बा आरक्षित ठेवण्याचा निर्णय मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने घेतला आहे. महिला प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित व्हावा, यासाठी डब्यात पोलिसांचा खडा पहारा राहणार आहे. शिवाय, साध्या वेषातील महिला पोलीसही गस्त घालणार आहेत. त्याचे नियोजन एकाच दिवसांसाठी असणार आहे. त्याशिवाय रेल्वेच्या वतीने रविवारी (दि.26) कोणत्याही प्रकारची दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार नाहीत.

रक्षाबंधनाच्या दिवशी एसटी, पीएमटी या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसह रेल्वेच्या प्रवासी संख्येत वाढ होत असते. यंदा रविवार हा साप्ताहिक सुट्टीचा वार आल्याने प्रवासी संख्येत आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे. हे गृहित धरून प्रशासनाच्या वतीने गाड्या आणि गर्दीचे नियोजन केले असून गरज पडल्यास गर्दी मार्गावरील गाड्यांना दोन ते तीन अतिरिक्त डबे जोडण्यात येणार आहेत. पुणे ते लोणावळा मार्गावर दररोज किमान पाऊण ते एक तासाला लोकल सेवा ठेवण्यात आली आहे. या लोकलला पुढील आणि मागली बाजूला एक-एक असे दोन डब्बे महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)