ऍड. अयुब पठाण यांनी रुग्णालयातून गाठले मतदान केंद्र

उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात आहेत ऍडमिट : ते सीबीआयचे माजी विशेष सरकारी वकील

पुणे – स्वादुपिंडामध्ये कॅल्शियमचे खडे झाल्याने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात ऍडमिट असलेल्या सीबीआयचे माजी विशेष सरकारी वकील अयुब पठाण यांनी काही वेळासाठी परवानगी घेऊन मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर ते पुन्हा उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत.

पठाण यांच्या स्वादुपिंडामध्ये कॅल्शियाचे खडे झाल्याने ते 7 मार्चपासून रुग्णालयात उपचार घेत आहेत. दररोज सकाळी भूल देऊन त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. त्याप्रमाणे आज (मंगळवार, दि. 23) सकाळी 9 वाजता त्यांना भूल देण्यात आली. ती साधारणपणे दुपारी 2 पर्यंत उतरली. त्यानंतर त्यांनी जेवण केले. आज लोकशाहीचा उत्सव आहे. आपण मतदान करू शकत नसल्याची खंत त्यांच्या मनात होती. त्यावेळी त्यांनी काही वेळासाठी मतदान करण्यास जावू द्यावे, अशी विनंती रुग्णालयात केली. त्यांना त्यास परवानगी देण्यात आली. त्यांनी बारामती लोकसभा मतदार संघात येणाऱ्या खडकवासल विधानसभा मतदार संघातील वारजे येथील रामचंद्र पाटलू चौधरी शाळेत जावून मतदान केले. राज्यघटनेने दिलेली जबाबदारी पार पाडू शकल्याचा आनंद त्यांना झाला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)