#MeToo: तुमच्या मुलांनाही त्रास होईल…तनुश्रीने नाना आणि गणेश आचार्यवरांच्या मुलांना दिला श्राप !

मुंबई : बॉलीवूडमध्ये सध्या तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांचे #MeToo प्रकरण खूप गाजले. तनुश्री दत्ताने २००८ साली एका चित्रपटाच्या वेळी आयटम सॉंग शूट केले जात असताना नाना पाटेकर यांनी आपल्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केले असल्याचे आरोप केले होते. तसेच तनुश्री दत्ता हिने गैरवर्तनाचे आरोप केल्यानंतर महिला आयोगाने अभिनेते नाना पाटेकर यांना नोटीस देखील बजावली होती.

दरम्यान हे प्रकरण संपण्यात जमा होते. मात्र तनुश्रीने पुन्हा एकदा नाना पाटेकर व गणेश आचार्यवर निशाणा साधत त्यांच्या मुलांना शाप दिले आहेत. तनुश्री दत्ताने नुकतीच एका वृत्त वाहिनीला मुलाखत दिली, ती म्हणाली  ‘तुम्हाला काय वाटतं माझ्यासोबत इतकं वाईट करूनही तुमच्या आयुष्यात भरभराट येईल तर तसं होणार नाही. मी तुम्हाला शाप देते. राखी सावंत, गणेश आचार्य, राकेश सारंग, सामी सिद्धिकी यांना माझे तळतळाट लागतील. ते कधीच यशस्वी होणार नाहीत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ती समोर म्हणाली, खासगी व व्यावसायिक दोन्ही ठिकाणी त्यांची अधोगतीच होणार. ज्या प्रकारे मला व माझ्या कुटुंबीयांना त्रास झाला. तसा तुमच्या मुलांनाही असाच त्रास होईल. तुमच्या मुलांवर देखील अत्याचार होती. तुमच्या मुलींना मानसिक व भावनिक त्रासाला सामोरे जावे लागले. तुम्हा कधीच सुखी राहू शकते नाही. हा माझा शाप त्या सर्वांसाठी आहे ज्यांनी मला त्यांच्या कृतीने, शब्दांनी त्रास दिला आहे. तुम्हाला माझ्या या शापातून कुणीही बाहेर काढू शकत नाही’,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)