मुंबई – बॉलीवूडमधील प्रसिद्ध आणि ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांची आज प्रकृती खालविल्याने त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 74 वर्षीय तनुजा यांना आयसीयुमध्ये दाखल करण्यात आले असून तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत माहिती मिळताच अभिनेत्री काजोलने रुग्णालयाला भेट दिली आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच काजोलचे सासरे आणि तिचा पती अजय देवगणचे वडिल विरु देवगण यांचे निधन झाले आहे.
ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांनी “ज्वेल थिफ’, “हाथी मेरा साथी’ आणि “दो चोर’यासह अनेक सुपरहिट ठरलेल्या हिंदी चित्रपटात काम केलेले आहे.