अभिनेत्री श्रीदेवी यांची हत्या झाली : डीजीपींच्या दाव्यानंतर खळबळ

मुंबई : बॉलिवुडची हवाहवाई गर्ल अर्थात अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्युबाबत धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. श्रीदेवी यांच्या मृत्यूला दुबई पोलिसांनी बुडून अपघाती मृत्यू मानले असले तरी डीजीपी ऋषीराज सिंह यांनी श्रीदेवी यांनी श्रीदेवी यांची हत्या झाली होती असा धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांना आश्‍चर्य वाटले. दरम्यान श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर यांना या प्रकरणावर आपले मत देण्यास सांगितले तेव्हा बोनी यांनी अशा तथ्यहिन गोष्टींवर त्यांना कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही असे म्हटले. तसेच अशा गोष्टी समोर येतच राहणार त्यामुळे निरर्थक गोष्टींवर बोलण्यात काहीच अर्थ नसल्याचेही बोनी म्हणाले.

डीजीपी ऋषीराज सिंह यांनी आपल्या कॉलममध्ये लिहिले की, त्यांचे एक मित्र फॉरेंसिक एक्‍सपर्ट आहेत. त्यांनी श्रीदेवी यांच्या मृत्यू प्रकरणात अनेक गोष्टींचा जवळून अभ्यास केला. यावरून त्यांचा आकस्मित मृत्यू झाला नसून श्रीदेवी यांची हत्या करण्यात आल्याचे दिसते. तसेच ते पुढे म्हणाले की, श्रीदेवी यांनी मद्यपान केले असले तरीही त्यांचा बुडून मृत्यू होऊ शकत नाही. याचे स्पष्टीकरण देताना ते म्हणाले होते की, एक फूटच्या बाथटबमध्ये कोणी कसे बुडू शकते. ऋषिराज सिंह यांनी लिहिलेल्या लेखानुसार, ‘कोणाचाही एखाद्या बाथटबमध्ये बुडून मृत्यू होणे शक्‍य नाही. कारण त्या बाथटबमध्ये अगदी फिट बसत होत्या. त्यांनी दावा केली की, श्रीदेवींचे दोन्ही पाय पकडले होते आणि त्यानंतर त्यांचं डोकं पाण्यात घालून त्यांना मारण्यात आले.’ ऋषिराज सिंह यांनी लेखातून केलेल्या या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)