अभिनेत्री पुजा बात्रा अडकली पुन्हा एकदा विवाहबंधनात

बॉलिवुडची अभिनेत्री पुजा बात्रा ही पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकल्याची माहिती समोर येत आहे. पुजाने तिचा बॉयफ्रेंड अभिनेता नवाब शहा याच्यासोबत साध्या पद्धतीन विवाह केला आहे. नवाबच्या बहिणीच्या लग्नासाठी पुजा श्रीनगरला गेली होती. त्यावेळी त्यांनी हा विवाह केला असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

View this post on Instagram

 

Man Crush Everyday @nawwabshah

A post shared by Pooja Batra (@poojabatra) on Jul 11, 2019 at 12:25am PDT

दरम्यान, याविषयीची माहिती तिने इंस्टाग्रामवर दिली आहे. पंजाबी चुडा घातलेला फोटो नुकताच पुजाने शेअर केला होता. पुजाने वेळोवेळी आपल्या नव्या जोडीदाराविषयी सोशलमीडियाच्या माध्यमातून माहिती दिली होती. तर काही दिवसांपुर्वी पुजाने नवाबसोबतचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत मॅन क्रश असे कॅप्शन दिले होते. दरम्यान, पुजा आणि नवाब हे लवकरच आपल्या विवाहाची नोंद करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)