अभिनेत्री मौसमी चॅटर्जी भाजपमध्ये दाखल

नवी दिल्ली: हिंदी आणि बांगला सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांच्या उपस्थितीमध्ये चॅटर्जी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणूकीमध्ये मौसमी चॅटर्जी या भाजपकडून निवडणूक लढवण्याची शक्‍यता आहे. यापूर्वी 2004 साली चॅटर्जी यांनी कॉंग्रेसकडून लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता.

यापूर्वी 2014 च्या लोकसभा निवडणूकीपूर्वी मौसमी चॅटर्जी यांनी ममता बॅनर्जी यांची भेट घेतली होती. त्यामुळे त्या तृणमूल कॉंग्रेसमध्ये सहभागी होण्याची अफवा पसरली होती. मात्र प्रत्यक्षात तसे काहीही घडले नव्हते. मूळच्या कोलकात्यातील असलेल्या मौसमी चॅटर्जी यांनी हिंदी आणि बंगाली सिनेमांमधून अभिनय केला आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)