अभिनेत्री आसावरी जोशी करणार कॉंग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई – आगामी लोकसभा आणि त्यानंतर होणा-या विधानसभा निवडणूकीत आपले नशिब आजमावण्यासाठी अनेक कलाकार राजकारणात प्रवेश करत आहे. मराठमोळी अभिनेत्री आसावरी जोशी यांनी राजकारणात एन्ट्री केली आहे. अभिनेत्री शिल्पा शिंदेनंतर आता आसावरी जोशी यादेखील कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उपस्थितीत आसावरी जोशी कॉंग्रेसमध्ये दाखल होणार आहेत.

काही दिवसांपूर्वी “बिग बॉस’च्या दहाव्या पर्वाची विजेती ठरलेली मराठमोळी टीव्ही अभिनेत्री शिल्पा शिंदेने कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता आसावरी जोशी यांनीही कॉंग्रेसला हात दिला आहे. 53 वर्षीय आसावरी जोशी यांनी अनेक मराठी-हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)