कन्हैया कुमारच्या प्रचारासाठी अभिनेते प्रकाश राज आणि जावेद अख्तर यांची उपस्थिती

File photo

बेगुसराय (बिहार) – नवी दिल्ली येथील जवाहरला नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार हा 2019 ची लोकसभा निवडणूक लढणार आहे. बिहारमधील बेगूसराय मतदारसंघातून कन्हैया कुमार लोकसभा निवडणूक लढणार आहे. आज बंगळुरू सेंट्रल मधून लोकसभा निवडणूक लढवत असलेले स्वतंत्र उमेदवार अभिनेते प्रकाश राज आणि ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी बेगूसराय येथे कन्हैया कुमारच्या प्रचारात सहभाग नोंदविला आहे.

कन्हैया कुमार हा भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा (भाकपा) उमेदवार म्हणून महाआघाडीच्या (काँग्रेस, राजद आणि डाव्या संघटना) सहकार्याने निवडणूक लढविणार आहे.  बिहारमधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या बेगूसराय मतदारसंघात आता गिरिराजसिंह विरुद्ध जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैय्या कुमार असा सामना रंगणार आहे. अशातच कन्हैया कुमारच्या प्रचारासाठी अभिनेते प्रकाश राज आणि जावेद अख्तर यांनी उपस्थिती दर्शिविली आहे.

https://twitter.com/ANI/status/1122170514422632448

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)