मुंबई – हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनय प्रशिक्षक रोशन तनेजा यांचे आज यकृताच्या कर्करोगाने निधन झाले 87 वर्षांचे होते. त्यांच्यावर सातांक्रुझ स्मशान भुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पुण्यातल्या एफटीआयआय संस्थेत अभिनय विभागाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. ते निवृत्त झाल्यानंतर त्यांनी स्वताची अभिनय प्रशिक्षण शाळाही काढली होती.
आज चित्रपट सृष्टीत नाव कमावणाऱ्या अनेक अभिनेत्यांचे ते अभिनय प्रशिक्षक होते. त्यात शबाना आझमी, ओम पुरी, नसरूद्दीन शहा, रणबीर कपुर, अनिल कपुर, राकेश बेदी इत्यादी नामवंत कलावंतांचा समावेश आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकताच शबाना आझमी यांनी त्यांना ट्विटरवर श्रद्दांजली अर्पण केली आहे. त्यांच्यामुळेच आपले करिअर घडले असे त्यांनी म्हटले आहे.