कोल्हापूर: सिंघम फेम आणि आता माझी सटकली या डायलॉग साठी जगभर प्रसिद्ध असणारे अभिनेता प्रकाश राज हे थेट शेतकऱ्यांचा नेता असणाऱ्या राजू शेट्टी यांच्या प्रचारात उतरले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यतल्या हातकणंगले लोकसभा मतदार संघातून स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. अभिनेता प्रकाश राज हे राजू शेट्टी यांच्या प्रचारासाठी आज इचलकरंजी शहरात आले होते. प्रकाश राज यांनी इचलकरंजी च्या विविध भागांमध्ये जाऊन खासदार राजू शेट्टी यांचा प्रचार केला आणि राजू शेट्टींना जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन केले. तसच सध्याचे सरकार हे दहशतवादी असल्याची टीका करत चौकीदार खाली खेचण्यासाठी तयार राहा अस आवाहन त्यांनी केलं.
अभिनेते प्रकाश राज यांनी सरकार वर टीका करत असताना दुसरी कडे राजू शेट्टी हे माझे चांगले मित्र आहेत. राजू शेतकऱ्याचा मुलगा आहे शेतकऱ्यांना आजवर त्यांनी न्याय दिला आहे शेतकऱ्यांसाठी दिल्लीमध्ये त्यांनी वारंवार आवाज उठवला आहे त्यामुळे मी या सरकारच्या विरोधात प्रचार करण्यासाठी महाराष्ट्रात आलो असल्याचं राज यांनी म्हटलं आहे