टॉलिवुड सुपरस्टार ‘महेश बाबू’ याची दोन बँक खाती सील

जीएसटी न भरल्या मुळे दणका !

टॉलिवुड सुपरस्टार महेश बाबू याची वस्तू आणि सेवाकर(जीएसटी) विभागानं दोन बँक खाती सील करण्यात आली आहेत.  महेश बाबू हे दक्षिणेतले मोठे सुपरस्टार असून, टॉलिवुडमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांमध्ये त्यांची नोंद आहे ७३.५ लाख रुपयांचा कर थकवल्याप्रकणी हि कारवाई महेश बाबू यांच्यावर करण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

२००७-०८ दरम्यान ब्रँड अँबेसेडर, चित्रपटातील अभियन आणि उत्पादनांच्या प्रचाराच्या केलेल्या जाहिरातीतल्या मिळालेल्या पैशांवर योग्य सर्व्हिस टॅक्स दिला नाही.म्हणून, गुरुवारी जीएसटी विभगाने महेश बाबू याच्या एक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँकेतल्या खाती गोठवली आहे. या मध्ये ज्यात कर, व्याज दर आणि दंडाचा समावेश आहे.

जीएसटी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितलं की, महेश बाबू यांना यासंदर्भात अपीलीय प्राधिकरणानं दिलासा दिलेला नाही. आम्ही बँक खाती गोठवून वसुलीला सुरुवात केली आहे. महेश बाबू यांची एकूण संपत्ती हि १४० कोटींहून अधीक आहे. इतकेच नव्हे, तर ते एका चित्रपटासाठी 18 ते 20 कोटी रुपये घेतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)