प्रभासच्या ‘साहो’ मध्ये ‘ही’ अभिनेत्री करणार आयटम साँग

मुंबई – “बाहुबली’मुळे यशोशिखरावर पोहोचलेल्या अभिनेता प्रभासच्या आगामी “साहो’ या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये बरीच उत्सुकता आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. येत्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी हा बहुप्रतिक्षित व बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जॅकलीन साहो सिनेमात आयटम साँगवर थिरकताना दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

Hope everyone is having a very very happy Eid!! Let’s spread JOY everywhere we go!! #eidmubarak 🙏🏻💝😊

A post shared by Jacqueline Fernandez (@jacquelinef143) on


या गाण्यात जॅकलीन, प्रभाससोबत आपल्या मादक अदांनी चाहत्यांचं मन जिंकायला सज्ज झाली आहे. प्रभास आणि जॅकलिनचं हे आयटम साँग चक्क ऑस्ट्रेलियामध्ये चित्रीत करण्यात आलं आहे. तर बादशहाने हे गाणं गायलं आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा


जवळपास दीड मिनिटाच्या या टीझरमध्ये ऍक्‍शनचा भरणा आहे. टीझरच्या सुरुवातीलाच श्रद्धा कपूर पाहायला मिळते. प्रभास व श्रद्धा पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करत आहेत. त्याचसोबत नील नितीन मुकेश, चंकी पांडे, महेश मांजरेकर यांचीही टीझरमध्ये झलक आहे.

“साहो’मधील साहसदृश्‍यांसाठी हॉलिवूडमधील 50 लोकांची एक टीम भारतात बोलावण्यात आली होती. या टीमने प्रभासला ऍक्‍शन सीनसाठी प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणात सहभागी असलेल्या 50 लोकांनी अनेक हॉलिवूड चित्रपटांसाठी काम केले होते. टीझरमधील ऍक्‍शन व दृश्‍ये एखाद्या हॉलिवूड चित्रपटाप्रमाणेच वाटतात. “साहो’मध्ये प्रभास एका गुप्तहेराच्या भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट तेलगू, तामिळ आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सुजीत यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)