वाढत्या वजनामुळे ट्रोल झालेला ‘हा’ अभिनेता पुन्हा एकदा चर्चेत

बाॅलीवूड अभिनेता फरदीन खान काही वर्षापासून चित्रपट क्षेत्रापासून लांब आहे. दोन वर्षापूर्वी  फरदीन खानची काही फोटो व्हायरल झाले होते. यामध्ये तो जाड झालेला दिसत होता. त्यामुळे तो सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल झाला होता. मात्र त्यानंतर आता फरदीन याचे लेटेस्ट फोटो व्हायरल झाले आहेत.

आताच्या फोटोमध्ये फरदीन खानचा लूक बदलेला दिसत आहे. रविवारी फरदीन हा त्याची पत्नी नताशा माधवानी आणि जवळचे मित्र याच्यांसोबत मुंबईतील एका रेस्टाॅरंटच्या बाहेर दिसला. अभिनेता फिरोज खान यांचा मुलगा फरदीन खान मागील काही वर्षापासून लंडनमध्ये आहे. त्याच कुंटुब लंडन शहरात स्थायिक झालं आहे. मात्र ताज्या बातमीनुसार फरदीन हा परत मुंबईमध्ये येऊ शकतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

साल 2016 च्या सुरवातीला फरदीन त्याच्या लूकमुळे ट्रोल झाला होता. वाढलेल्या वजनामुळे सोशल मीडियावर अनेकांनी त्याला ट्रोल केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना फरदीनने म्हटले होते की, मी तुमच्या ट्रोलमुळे नाराज नाही झालो आहे. मी माझ्या जीवनात सुखी आहे आणि जीवनाचा पूर्ण आनंद घेत आहे.

फरदीन खान याने 1998 मध्ये ‘प्रेम अगन’ या चित्रपटातून बाॅलीवूडमध्ये पर्दापण केले होते. त्यानंतर त्याने ‘जंगल’,’प्यार तूने क्या किया’, ‘अोम जय जगदीश’, ‘खुशी’, ‘फिदा’ अशा चित्रपटात काम केले आहे. 2010 मध्ये तो दूल्हा मिल गया या चित्रपटात तो दिसला होता. त्यानंतर मागील 8 वर्षापासून तो चित्रपट जगतापासून लांब आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)