नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी रविवारी 59 जागासाठी मतदान होत आहे. तसेच 23 मे ला लोकसभा निवडणुकीचा निकाल घोषित होणार आहे. मात्र, याच दरम्यान अभिनेता अरूण बख्शी यांनी छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री डाॅ. रमन सिंह यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.
Delhi: Actor Arun Bakshi joins BJP in the presence of party leader and former Chhattisgarh CM Raman Singh. pic.twitter.com/F661io7hBe
— ANI (@ANI) May 11, 2019
माजी मुख्यमंत्री डाॅ. रमन सिहं यांनी अभिनेता अरूण बख्शी यांच पक्षात स्वागत केले आहे. दिल्ली येथील भाजपाच्या मुख्यालयात हा पक्षप्रवेश झाला.
दरम्यान, अरूण बक्शी यांनी 1981 मध्ये आपल्या सिनेमातील कारकिर्दिस सुरूवात केली होती. त्यांनी 100 पेक्षा अधिक हिंदी सिनेमात काम देखील केले आहे.