जुन्या पेन्शनर संघटनेचा संपात सक्रिय सहभाग

नगर- महाराष्ट्रातील सर्वांत मोठ्या असणाऱ्या महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेने संपात सहभागी घेतला आहे. राज्य सरकारी समन्वय समितीला साथ देऊन या संघटनेने संपात सक्रिय सहभाग नोंदवला आहे.

पेन्शन संघटनेत सर्व शासकीय विभागातील कर्मचारी समाविष्ट आहेत. राज्याध्यक्ष वितेश खांडेकर आणि राज्य सरचिटणीस गोविंद उगले यांच्या सूचनेनुसार संघटनेचे नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र ठोकळ यांनी नियोजन केले. जिल्ह्यातील सर्व जुन्या नव्या पेन्शनधारकांना संपात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्या प्रमाणे सर्व शासकीय विभागातील, अनुदानीत संस्थेतील कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. आज शंभर टक्के कर्मचारी या संपात सहभागी झाल्याची माहिती जिल्हा प्रसिद्धी प्रमुख शैलैश खनकर यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जुनी पेन्शन, कुटुंब निवृत्तीवेतन, ग्रॅच्युइटी, भविष्य निर्वाह निधीयोजना सुरू करण्यात यावी,त्वरित अनुकंपा लाभ मिळावा, शिक्षकांना 12 वर्षानंतर वरिष्ठ वेतनश्रेणी मिळावी, यासह सातवा वेतन आयोग मिळावा अशा प्रमुख मागण्या आहेत. यात जर जुनी पेन्शन मिळाली नाही, तर पेन्शन संघटना दोन ऑक्‍टोबरपासून मंत्रालयाला घेराव घालण्याचा इशारा देण्यात आला. संपकरी कर्मचाऱ्यांना सरकारकडून लवकरच न्याय मिळेल, असा विश्वास विश्वस्त बाजीराव मोढवे, राज्यप्रतिनिधी बाबुराव कदम, राज्यनेते योगेश थोरात, कार्याध्यक्ष सचिन नाबगे, उच्चाधिकार अध्यक्ष केशवराव कोल्हे, उपाध्यक्ष प्रतिक नेटके यांनी व्यक्त केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)