निष्क्रीय पैशाला सक्रीय करा (भाग-१)

बऱ्याच वेळा वेगवेगळ्या माध्यमातून मिळालेला पैसा नेमके उद्दीष्ट न ठरल्याने घरामध्ये अथवा बँकेतील बचत खात्यामध्ये पडून राहतो. अनेक दिवस गुंतवणूकदार जमा असलेला पैसा कशाला तरी लागेल, अचानक पैशांची गरज निर्माण झाली तर असू दे किंवा याचे काय करायचे हे नंतर ठरवून असे मनाचे समाधान करून असलेले पैसे गुंतवायचे राहून जातात.

श्री. रामकुमार, वय ३२. नोकरदार गृहस्थ, पुण्याच्या उपनगरामध्ये रहात आहेत. त्यांच्यासोबत गृहिणी असलेली पत्नी तसेच पाच वर्षांचा मुलगा व आई असे छोटेखानी कुटुंब आहे. श्री. रामकुमार यांना दरमहा १,२१,००० चा पगार मिळतो व रु. १५,००० घर भाड्याचे मिळतात. असे एकूण दरमहाचे उत्पन्न रू. १,३६,००० आहे. स्वतः श्री. रामकुमार हे भाड्याच्या घरात रहात आहेत. जरी स्वतःचे घर असले तरी त्या घरावर रू. ५५ लाखांचे बँकेतून कर्ज घेतले आहे. या गृहकर्जाचा मासिक हप्ता रू. ३२,००० ते भरत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

श्री. रामकुमार यांनी त्यांच्या भविष्यातील उद्दीष्टांसाठी जसे की, आपत्कालिन गरजांसाठी, मुलाच्या शिक्षण व लग्नासाठी व स्वतःच्या निवृत्तीसाठी गुंतवणुकीचे नियोजन करण्याचे ठरवले आहे. त्यांच्याकडे सध्या जे मालकीचे घर आहे त्याची बाजारभावाप्रमाणे मिळणारी रक्कम रू. ९०,००,००० एवढी आहे. म्युच्युअल फंडामधील इक्विटी योजनांमध्ये एकूण गुंतवणूक रू. १५,०८,००० आहे. एम्प्लॉयी प्रॉव्हिडंट फंडामध्ये रू. १७,१२,००० जमा आहेत. पब्लिक प्रॉव्हिडंट फंडामध्ये रू. ४०,००० व राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये रू. ८३,००० जमा आहेत. म्युच्युअल फंडांच्या डेट योजनांमध्ये एकूण गुंतवणूक एक लाखांची आहे व बँकेच्या बचत खात्यामध्ये रू. ७५,००० जमा आहेत.

दरमहा घरखर्चासाठी, विम्याचे हप्ते व गुंतवणुकीच्या एसआयपी केल्यानंतरही त्यांच्याकडे रू. १६,००० रक्कम दरमहा शिल्लक राहते.

आता प्रश्न असा आहे की, या १६,००० चे करायचे काय. या निष्क्रीय पैशाचा कसा वापर करावा व त्यामुळे वर उल्लेख केलेल्या उद्दीष्टांसाठी योग्य ती रक्कम कशी निर्माण करता येईल याचा विचार श्री. रामकुमार करत आहेत.

यासाठी त्यांनी स्वतःच्या आर्थिक सल्लागाराची मदत घेण्याचे ठरवले. जो आर्थिक योजना तयार करण्यामध्ये (फायनान्शियल प्लॅनिंग) तज्ञ आहे. त्याची मदत घेऊन आपली उद्दीष्टे भविष्यात कशी पूर्ण करता येतील याचे नियोजन त्यांनी केले.

आपत्कालिन गरजांसाठी पुरतील असे रू. २.९ लाख ही रक्कम बाजूला ठेवण्यात आली. जी रामकुमार यांच्या तीन महिन्यांच्या मासिक खर्चाची सोय व सर्व हप्ते यातून भागवता येतील. या रकमेसाठी आर्थिक सल्लागाराने रामकुमार यांना त्यांच्याजवळील रोख रक्कम व डेट म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतील काही रक्कम वापरण्यास सांगितली.

श्री. रामकुमार यांच्या मुलाच्या भविष्यातील शिक्षणासाठी रू. एक कोटींची गरज आहे. ही रक्कम पुढील तेरा वर्षात उभी करायची आहे. त्यासाठी दरमहा १७,००० रुपयांची मासिक एसआयपी म्युच्युअल फंड योजनेच्या इक्विटी डायर्व्हिसिफाईड योजनांमध्ये करण्यास सुरवात केली. मुलाच्या लग्नासाठी लागणाऱ्या रु. ६०,००,००० ची गरज आजपासून वीस वर्षांनी लागणार आहे. त्यासाठी रू. ६,००० ची म्युच्युअल फंडातील एसआयपी मिडकॅप योजनांमध्ये करण्यास सुरवात केली व रू. १,००० दरमहा सोने रोख्यात (गोल्ड बॉन्ड) करण्यास सुरवात केली.

स्वतःच्या निवृत्तीसाठी श्री. रामकुमार यांना रू. नऊ कोटींची रक्कम लागणार आहे. जी आजपासून २८ वर्षानंतर उपलब्ध करायची आहे. यासाठी आर्थिक सल्लागाराने श्री. रामकुमार यांचे ईपीएफ, पीपीएफ, एनपीएस आणि इक्विटी फंडातील योजनांमध्ये गुंतवलेली रक्कम निवृत्तीसाठी बाजूला ठेवण्यात आलेली आहे.

निष्क्रीय पैशाला सक्रीय करा (भाग-२)

या सगळ्या गुंतवणुकीमधून २८ वर्षांनी श्री. रामकुमार यांना ६ कोटी ९० लाख रुपये उभे करता येणार आहे व उर्वरीत रकमेसाठी दरमहा रू. १२,००० ची म्युच्युअल फंडातील एसआयपी मल्टीकॅप योजनांमध्ये सुरु करण्यास सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)