आचारसंहिता भंग करणाऱ्यांवर होणार कारवाई

मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास सक्त मनाई गरोदर महिला, वृध्द व दिव्यांग मतदारांना थेट प्रवेश

मतदान केंद्रात मोबाईल बंदी
मतदारांनी मतदान करायला जाताना मोबाईल सोबत घेवून जावू नये ; मतदान केंद्रात मोबाईल बाळगण्यास मनाई असल्याने आपला मोबाईल घरीच ठेवून यावे.

सातारा – मतदारांनी मतदान करायला जाताना मोबाईल सोबत घेवून जावू नये ; मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास सक्त मनाई असून निवडणूक आयोगाची आचारसंहिता भंग करणाऱ्यावर कारवाई होणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी श्‍वेता सिंघल यांनी दिली. मंगळवार दि. 23 एप्रिल 2019 रोजी सकाळी 7 ते सायं 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याची संधी गमावू नका.

मतदानाचा हक्क्‌ बजावण्यासाठी मतदान केंद्रामध्ये आपले वैध मतदार छायाचित्र ओळखपत्र सोबत घेऊन जावे, मतदान ओळखपत्र नसल्यास मतदाराने पासपोर्ट, वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (केंद्र/राज्य शासन/सार्वजनिक उपक्रम/सार्वजनिक मर्यादित कंपनीने कर्मचाऱ्यांना दिलेले ओळखपत्र), छायाचित्र असलेले बॅंकेचे पासबुक, पॅनकार्ड, मनरेगा कार्यपत्रिका, कामगार मंत्रालयाद्वारे दिले गेलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज, खासदार/आमदार/विधान परिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र, आधारकार्ड यापैकी कोणतेही एक दस्तावेज ओळखपत्र म्हणून मतदान केंद्रावर सादर करता येणार आहे. असे आवाहनही जिल्हा निवडणूक अधिकारी श्‍वेता सिंघल यांनी केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महिला आपल्या लहान मुलांना घेऊन मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी येतात, त्यांच्या मुलांसाठी पाळणाघराची व्यवस्थाही करण्यात आली आहे. मतदानासाठी एका पुरुषामागे 2 महिलांना मतदानासाठी मतदान कक्षात प्रवेश दिला जाणार असल्याचेही जिल्हा निवडणूक अधिकारी श्‍वेता सिंघल यांनी सांगितले. भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार 15 प्रकारच्या सुविधा मतदान केंद्रावर देण्यात येणार आहेत. यामध्ये लहान मुलांसाठी पाळणघराची सुविधाही देण्यात येणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर मेडिकल कीटही उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्‍वेता सिंघल यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)