बंडलबाज विक्रेत्यावर कारवाईचा बडगा सुरूच

एफडीएकडून शहरासह जिल्ह्यात धडक कारवाई : पंधरा दिवसांत दुसरी घटना

पुणे – अस्वच्छ ठिकाणी निऱ्याची साठवणूक केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) चाकण येथील सरकारमान्य निरा विक्री केंद्रावर छापा टाकून 148 लिटर निरा नष्ट केली. गेल्या पंधरा दिवसांतील ही दुसरी घटना असून, या कारवाईवरून शहर आणि जिल्ह्यात निरा विक्रेते आणि थंड पेय विकणारे व्यवसायिक नागरिकांना आरोग्यासाठी धोकादायक ठरणारे पेय विकत असल्याचे दिसून येते. त्या या “बंडलबाज’ विक्रेत्यांवर यापुढेही अशीच कारवाई सुरू राहणार असल्याचे एफडीए प्रशासनाकडून सांगण्यात आले.

उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे नागरिकांकडून निरा, लिंबू सरबत, कोकम यासह कोल्ड्रींग आदी शीतपेयांना मागणी वाढते. मात्र, वाढत्या मागीचाच फायदा घेत काही “बंडलबाज’ विक्रेत्यांकडून थंड पेयामध्ये भेसळ केली जाते तर अनेकठिकाणी हे पेय अस्वच्छ ठिकाणी तयार करत असतात. दरम्यान, एफडीएला मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी (दि. 20) चाकण येथे केलेल्या कारवाईत 4 हजार 440 रुपये किंमतीची अस्वच्छ ठिकाणावरील निरा नष्ट केली. तसेच त्यांचे नमुने घेवून ते राज्य प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले आहेत. तर, चाकण परिसरातील आंबेठाण येथे अवैधरित्या जार विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या एका दुकानावर कारवाई करण्यात आली. त्यांना व्यवसाय थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

नुकतेच अन्न व औषध प्रशासनाने सोमवार पेठेतील जुन्या जिल्हा परिषदेजवळील निरा सोसायटीवर कारवाई करुन 4 हजार 700 रूपयांचा निरा नष्ट केली होती. यावेळी टाकलेल्या छाप्यात प्रशासनाला त्याठिकाणी अस्वच्छ आणि त्यामध्ये बर्फही ठेवण्यात आल्याचे दिसून आले होते. यानंतर संबंधीत सोसायटीवर कारवाई करण्यात आली. मात्र, अशा प्रकारचे अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे.

चाकण येथील सरकारमान्य निरा विक्री केंद्रामध्ये छापा टाकल्यानंतर अस्वच्छ ठिकाणी निरा साठवल्याचे दिसून आले. तसेच, संबंधीताकडे टेस्टीग रिपोर्ट नसल्याचे प्राथमिक पाहणीत समोर आले. परिणामी अशुध्द निरा नष्ट करण्यात आली असून पुढील कारवाईसाठी त्याचे नमुने घेऊन प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत.
– ए. जी. भुजबळ, सहायक आयुक्‍त, अन्न व औषध प्रशासन विभाग.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)