मोक्‍याची कारवाई येथून पुढेही सुरूच राहणार

अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील

सातारा – आयजी विश्वास नांगरे पाटील यांच्यामुळे साताऱ्यात मोक्‍याची कारवाई झाल्या होत्या. आतापर्यंत तेरा जणांना मोक्का लावण्यात आला. त्यापैकी फक्त केवळ एकाला जामीन मिळाला आहे परंतु इथून पुढेही मोक्‍याच्या कारवाई अशा सुरू राहणार आहे. कोणालाही जामीन मिळणार नाही याची दक्षता घेण्यात येईल. तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारांवरही बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा जिल्ह्याचा अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून कार्यभार धीरज पाटील यांनी स्वीकारला. त्यावेळी पत्रकारांशी वार्तालाप करताना ते बोलत होते. यापूर्वी धीरज पाटील यांनी चंद्रपूर, अहमदनगर, मिरज व इचलकरंजी या शहरांमध्ये पोलीस उपअधीक्षक म्हणून काम केले आहे. हा कामाचा अनुभव असल्यामुळे सातारसारख्या संवेदशील भागात सुद्धा काम करताना काही अडचण येणार नाही असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला , तसेच येणाऱ्या निवडणुकासुद्धा अत्यंत शांतता, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न कुठेही निर्माण होणार नाही अशा पद्धतीने राबवल्या जातील असे सांगीतले.

पोलीस अधीक्षक यांच्याशी सुसंवाद साधून संवादातूनच काम करणार असल्याचे े पाटील यांनी सांगितले. साताऱ्यात अलीकडे अनेक ठिकाणी बेकायदा शस्त्रे मिळून आली आहेत. त्यामुळे या शस्त्रांच्या मुळाशी जाऊन ही शस्त्रे कशी साताऱ्यात येतात याची माहिती घेऊन आरोपींवर कारवाई करणार असल्याचे सांगितले.
 

प्राथमिक शिक्षण ते पोलिस अधीक्षक
धीरज पाटील यांनी प्राथमिक शिक्षक म्हणून सेवा सुरू केली. परंतु एमपीसीची स्पर्धा परीक्षांच्या आवड असल्यामुळे त्यांनी स्पर्धा परीक्षा दिल्या. त्यामुळे थेट प्राथमिक शिक्षक पासून अतिरिक्त पोलिस अधीक्षक असा प्रवास धीरज पाटील यांनी केला आहे. त्यामुळे आपले पाय कायम जमिनीवरच असतात असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)