दादर परिसरात प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई

मुंबई: दादर परिसरात असलेल्या फूल आणि भाजी मार्केटमध्ये प्लॅस्टिक पिशव्या, प्लॅस्टिक वेस्टन आणि नॉन वोवन बॅग्ज वापर करणाऱ्या विक्रेत्यांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी धडक कारवाई केली. या कारवाईत 35 हजार रुपयांचा दंड वसूल करत 144 किलो प्लॅस्टिकचा माल जप्त करण्यात आला आहे.

प्लॅस्टिक बंदीअंतर्गत फुलांची सजावट, बुके यांच्या वेष्टनासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लॅस्टिकवर बंदी असूनदेखील मुंबई शहरातील दादर परिसरात पहाटे सुरू होणाऱ्या घाऊक फूल बाजारात प्लॅस्टिक पिशव्यांचा, प्लॅस्टिक वेष्टन, नॉन वोवन बॅग्ज व नॉन वोवन याचा सर्रास वापर केला जात असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या भरारी पथकाला मिळाली.

त्याचबरोबर दादर पश्‍चिमच्या भाजी मार्केटमध्ये देखील प्लॅस्टिक बंदीच्या नियमाचे उल्लंघन होत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या भरारी पथकाने पहाटे 5 वाजता दादरच्या फूल मार्केट व भाजी मार्केटमध्ये धडक मोहीम हाती घेऊन विक्रेत्याकडून 35 हजार रुपयांचा दंड व 144 किलो प्लॅस्टिकचा माल जप्त केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)