अनधिकृत धार्मिक स्थळांवर दिवाळीनंतर कारवाई

पुणे – शहरातील अनधिकृत धार्मिकस्थळावर दिवाळीनंतर महापालिकेतर्फे कारवाई करण्यात येणार आहे. गेल्यावर्षी काही धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रस्त्यात अडथळा ठरणारे आणि बेकायदेशीर धार्मिक स्थळांवर कारवाई करणे महापालिकेला बंधनकारक करण्यात आले आहे. 2016 मध्ये न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. यावर कार्यवाही न केल्यास महापालिका आयुक्‍तांना जबाबदार धरण्यात येणार असल्याचे न्यायालयाने कडक शब्दात सुनावले होते.

न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकांनी धार्मिकस्थळांची यादी तयार करायला घेतली.अधिकृत, अनधिकृत, धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी झालेले असा तपशील जमा करण्यात आला. अधिकृत आहेत परंतु रस्त्यात अडथळा ठरतात, अशा स्थळांना स्थलांतरित करण्यात आले. कारवाईतील धार्मिकस्थळांमध्ये सर्व धर्मीयस्थळांचा समावेश आहे. गेल्यावर्षी महापालिकेने सुमारे 100 हून अधिक धार्मिक स्थळे काढून टाकली आहेत. आणखी 736 बेकायदेशीर धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई दिवाळीनंतर सुरू होणार असून, त्या धार्मिकस्थळांना महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाकडून नोटीसा देण्याला सुरूवात करण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अनेक नागरिकांनी आणि संस्थांनी मागीलवर्षी याला विरोध केला होता. मात्र, महापालिकेने पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केले. दिवाळीनंतरही पोलीसांच्या समन्वयाने ही कारवाई करण्यात येणार असल्याचे विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
शहरात समाविष्ट झालेल्या गावांमधील धार्मिकस्थळांबाबत अद्याप माहिती घेण्यात आली नाही. परंतु नव्या प्रभागरचनेत क्षेत्रीय कार्यालयांचीही हद्द बदलल्याने त्यांच्याकडून त्यांच्या भागातील अनधिकृत मंदिरांची रिफ्रेश यादी मागवण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)