विवरण न भरणाऱ्या कंपन्यांवर कारवाई

नवी दिल्ली, दि.3-2015-16 आणि 2016-17 वर्षासाठी कर परतावे न भरणाऱ्या 2,25,910 कंपन्यांवर कंपनी व्यवहार मंत्रालय कारवाई करणार आहे. कंपनी व्यवहार राज्यमंत्री पी. पी. चौधरी यांनी आज लोकसभेत ही माहिती दिली. 2017-18 या वर्षात 2.97 लाख कंपन्यांनी 2 किंवा त्यापेक्षा जास्त आर्थिक वर्षासाठी वित्तीय विवरण पत्रे किंवा वार्षिक परतावे भरलेले नाहीत.

त्यापैकी 2,26,166 कंपन्यांचे नाव रजिस्टर्स ऑफ कंपनीजमधून वगळण्यात आले आहे. महाराष्ट्रातील 1,36,335 कंपन्यांनी गेल्या वर्षभरात वित्तीय विवरण पत्रे सादर केली आहेत. 62001 कंपन्यांनी ती सादर केलेली नाहीत. 1,37,122 कंपन्यांनी वार्षिक परतावे सादर केले आहेत तर 61,149 कंपन्यांनी ते सादर केलेले नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)