राज्यात 56 कॉपीबहाद्दरांवर कारवाई

पुणे  – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता बारावीसाठी शनिवारी घेण्यात आलेल्या मराठीसह इतर भाषा विषयांच्या पेपरसाठी राज्यात 56 विद्यार्थी कॉपी करताना सापडले. गुरुवारपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली असून सकाळ व दुपार अशा दोन सत्रात ही परीक्षा सुरू असते. मराठीसह गुजराती, कन्नड, सिंधी, मल्याळम, तामिळ, तेलगू, पंजाबी, बंगाली या भाषांच्या पेपरसाठी काही विद्यार्थी गैरमार्गाचा अवलंब करताना आढळून आले आहेत.

औंरगाबादमध्ये 28, नागपुरमध्ये 13, अमरावतीत 1, नाशिकमध्ये 12, लातूरमध्ये 2 याप्रमाणे विभागनिहाय कॉपी करताना विद्यार्थी आढळून आले आहेत. पुणे, मुंबई, कोल्हापूर, कोकण या विभागांत एकही गैरमार्गाचे प्रकरण आढळून आले नाहीत. दुपारच्या सत्रात उर्दु, पाली, फ्रेंच या विषयांसाठी झालेल्या पेपरमध्ये एकही कॉपीचे प्रकरण आढळले नाही, असे राज्य मंडळाकडून सांगण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)