सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डाची 12 कंपन्यांवर कारवाई

मुंबई: राज्यात प्लॅस्टिक बंदी लागू करण्यात आल्यानंतर ग्राहकांना फसवून पर्यावरणपूरक वस्तूंच्या नावाखाली प्लॅस्टिकची विक्री केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डाने कारवाईचा बडगा उगारला आहे. यामध्ये एकूण 12 कंपन्यांचा समावेश आहे.

खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे पर्यावरणपूरक वस्तूंच्या नावाखाली प्लॅस्टिकचीच सर्रास विक्री सुरु असल्याचे समोर आले आहे. प्लॅस्टिक बंदीनंतर काही कंपन्यांनी पर्यावरणपूरक विघटनशील पिशव्यांची निर्मिती करायला सुरुवात केली. मात्र या पिशव्यांची निर्मिती करताना प्लॅस्टिकचेच घटक वापरले गेले आणि पिशव्या पर्यावरणपूरक विकल्या गेल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या पिशव्यांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडे आवश्‍यक प्रमाणपत्र नसल्याचे समोर आले आहे. सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डने अशा 12 कंपन्यांवर कारवाई करणार आहे. संबंधित कंपन्यांबाबत एटीआर दाखल करण्याचे आदेश सेंट्रल पोल्युशन बोर्डाने दिले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)