सलग दुसऱ्यांदा अक्षय कुमारच्या सिनेमाला पायरसीचे ग्रहण 

केसरी सिनेमा होळीच्या पहिल्याच दिवशी पायरसीचा रंग

होळीच्या दिवशी प्रदर्शित झालेल्या कुमारच्या ‘केसरी’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसला आपल्या रंगात रंगवून टाकले आहे. मात्र, ‘केसरी’ सिनेमाला पायरसीचा रंग लागला आहे. हा सिनेमा काही तासातच पायरसीसाठी नावाजलेल्या ‘तामिल रॉकर्स’ या वेब साईटवर लीक झाला आहे.

यापूर्वी सुद्धा ‘तामिल रॉकर्स’ या वेब साईटवर अक्षय कुमारचा ‘गोल्ड’ सिनेमा लीक झाला होता. त्यामुळे सलग दुसऱ्यांदा अक्षय कुमारच्या सिनेमाला पायरसीचे ग्रहण लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)