स्मार्ट सिटी योजनेत घोटाळ्याचा आरोप

पुणे – स्मार्ट सिटी योजनेतील अधिकारी भाजप- शिवसेना युती सरकारच्या आशीर्वादाने जनतेचा पैसा लुटण्याचे काम करत आहेत. या योजनेच्या माध्यमातून गेल्या चार वर्षांत शहरात कोणतेही प्रभावी काम झालेले नाही. याउलट कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. या भ्रष्टाचाराचा पोलखोल केल्याशिवाय राहाणार नाही, असा इशाराही मनसेने दिला आहे.

मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी पत्रकार परिषदेत हा आरोप केला. यावेळी शहर उपाध्यक्ष हेमंत बत्ते, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुशीला नेटके उपस्थित होते. ही योजना राबविण्याच्या आधी केंद्र आणि राज्य शासनानेही यासंदर्भात कोणताही अभ्यास केलेला नाही. त्यामुळेच अल्पावधीतच ही योजना सपशेल अपयशी ठरली आहे, असा आरोप करुन शिंदे म्हणाले की, ज्या शहरांमध्ये ही योजना राबविण्यात आली आहे. त्या शहरांचा विकास नव्हे तर ही शहरे भकास करण्याचे काम केंद्र शासनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. योजनेत प्रचंड गोंधळ, भ्रष्टाचार, अनागोंदी आणि अनियमित कारभार होत असून जनतेच्या पैशाची लूट केली जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

योजनेत निविदा न मागविता ठेकेदार आणि सल्लागारांवर कोट्यावधी रुपयांची उधळण करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार केलेला नाही. त्यासंदर्भात शासनाच्या नियमानुसार प्रशासकीय शेरेही मारलेले नाहीत. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत कोणत्याही भरीव योजना राबविण्यात आलेल्या नाहीत. याउलट केवळ जाहिरातबाजी करण्यात आली आहे. सल्लागार आणि ठेकेदारांवर कोट्यवधी रुपयांची उधळण करण्यात आली आहे, असा आरोपही शिंदे यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)