मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री ‘सोनाक्षी सिन्हा’ सध्या एका वादात सापडली आहे. सोनाक्षी विरोधात उत्तरप्रदेशच्या मुरादाबादयेथील कटघर पोलीस ठाण्यात (कलम 420) फसवणूक आणि (कलम 406) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सोनाक्षीसह अन्य पाच जणांवर सुद्धा याप्रकरणी एफआयआर दाखल दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेश पोलीस आज सोनाक्षीच्या मुंबई येथील घरी (रामायण बांगला) दाखल झाले आहेत.
UP Police: Case registered against actress Sonakshi Sinha at Katghar Police Station under sections 420 (cheating) & 406 of IPC. In 2018, she had taken ₹24 lakh for a stage performance but didn’t turn up. Police went to her residence in Mumbai, y’day but she wasn’t present then. pic.twitter.com/MB9347mgtn
— ANI UP (@ANINewsUP) July 12, 2019
2018 मध्ये एका स्टेज परफॉर्मन्ससाठी सोनाक्षीने 24 लाख रुपये घेतले होते. परंतु पैसे घेतल्यानंतरही ती कार्यक्रमात सहभागी झाली नाही. या केससंदर्भात चौकशी करण्यासाठी पोलीस सोनाक्षीच्या जुहू येथील बंगल्यावर दाखल झाले. परंतु यावेळी सोनाक्षी तिच्या घरी नव्हती त्यामुळे पोलिसांना तेथून माघारी जावे लागले.