नियमानुसार ‘ती’ मालिका थांबवता येणार नाही

प्राप्त तक्रारीवर जिल्हाधिकारी कार्यालयाचे स्पष्टीकरण

पुणे – “आचारसंहितेच्या नवीन नियमानुसार एखादा अभिनेता निवडणूक लढवत असल्यास त्याची एखादी मालिका खासगी वाहिनीवर सुरू असेल, तर ती थांबविता येणार नाही; मात्र दूरदर्शनसारख्या शासकीय वाहिन्यांवर अभिनेता असलेल्या उमेदवारांच्या मालिका दाखविता येणार नाहीत. त्यामुळे अमोल कोल्हे यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतरही त्यांची मालिका आचारसंहितेच्या नवीन नियमावलीनुसार थांबवता येणार नाही,’ असे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून एका अभिनेत्याला उमेदवारी दिली गेल्यास निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार या अभिनेत्याच्या टीव्ही मालिकेवर काय कार्यवाही करावी, याबाबत अभिप्राय मागविला जाणार होता. दरम्यान, याबाबत निवडणूक आचारसंहिता जाहीर होण्याच्या दिवशीच दैनिक “प्रभात’ने यासंदर्भातील बातमी प्रकाशित केली होती. त्यावेळी “संबंधित प्रकरणात केंद्रीय निवडणूक आयोगाकडून यांसंदर्भात अभिप्राय मागविला जाणार आहे,’ असे स्पष्टीकरण त्यावेळी देण्यात आले होते. दरम्यान, याच आशयासंदर्भात जिल्हा निवडणूक विभागाकडे

ई-मेल आणि “सी-व्हीजील’ ऍपवर प्राप्त झालेल्या तक्रारीचा निपटारा करताना वरील स्पष्टीकरण देत ही तक्रार निकाली काढण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)