ऊस वाहतूक करणारा ट्रक उलटल्याने चालक जखमी

कोपरगाव – उसाने भरलेला ट्रक (क्र. एमएच 17 6453) संजीवनी कारखान्याकडे जात असताना साईबाबा कॉर्नर येथे उलटाल. यात चालकास दुखापत झाल्याने त्यास रुग्णालयात दाखल करण्यात आले. ट्रकचे मोठे नुकसान झाले. हा अपघात शुक्रवारी (दि. 16) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडला.

या अपघातात सचिन शिवाजी लिंबोरे (रा. दत्तनगर) यांची साईबाबा कॉर्नर येथील हातगाडी व कमलाकर पवार (रा. सुभाषनगर) यांची बूट पॉलिशचे छोटे दुकान ट्रकखाली चक्काचूर झाले. सुदैवाने हे दोघेही तेथे नसल्याने जीवित हानी टळली. या अपघातामुळे नगर-मनमाड महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.

-Ads-

शनिवारी सकाळी उशिरा अपघातग्रस्त ट्रक बाजूला काढण्याचे काम सुरू होते. शनिवारी सकाळी पुणतांबा चौफुली येथे दुसऱ्या ट्रकचा अपघात झाल्याने तो रस्त्याच्या मधोमध बंद पडल्याने वाहतूक बराच वेळ खोळंबली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)